बोलण्यात गुंतवून अंगठी पळवली

0
290

आळंदी, दि. १ (पीसीबी) – देवदर्शनासाठी निघालेल्या वृद्ध व्यक्तीला बोलण्यात गुंतवून दोन अनोळखी व्यक्तींनी वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी पळवली. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मोशी-आळंदी रोडवर हवालदारवस्ती येथे घडली.

चंद्रकांत राजूशेठ हालगे (वय 72, रा. मोशी) यांनी याप्रकरण एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोशी येथून आळंदीला देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना इशारा करून थांबवले. फिर्यादी यांच्याशी गप्पा मारत असताना हातचलाखीने त्यांच्या हातातील पाच ग्राम वजनाची 10 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत