कोयता बाळगल्या प्रकरणी एकास अटक

0
603

रहाटणी, दि. ३० (पीसीबी) – कोयता बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 29) पहाटे अडीच वाजता जगताप डेअरी जवळ, रहाटणी येथे करण्यात आली.

पंकज हरिप्रसाद बाजूळगे (वय 25, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक फौजदार बाबाजान इनामदार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज याने त्याच्याकडे कोयता बाळगला. कोयता जवळ बाळगून रस्त्यावर थांबून त्याने परिसरात दहशत पसरवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी पंकज याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक कोयता जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.