माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचं निधन

0
302

अहमदनगर, दि. २७ (पीसीबी) – माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचं निधन झालं असून ते ८७ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवलं होतं.