व्यावसायिक कारणावरून एकावर खुनी हल्ला

0
1296

चिंचवड दि. २७ (पीसीबी) – आपला व्यवसाय चालत नसल्याच्या कारणावरून एकाने दुसऱ्या व्यावसायिकाला कोयता व सत्तूरने मारत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 25) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास खंडोबा माळ ते थरमॅक्स चौक दरम्यानच्या मार्गावर चिंचवड येथे घडली.

उमेश कुमार गोरख गुप्ता (वय 35, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत मिरजे (रा. ओटास्कीम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे रिक्षा हूड व इंटिरियर व डेकोरचे दुकान आहे. ते त्यांच्या कामगारासोबत दुकानात काम करत होते. फिर्यादी यांच्या दुकानाशेजारी आरोपीचे देखील दुकान आहे. फिर्यादी यांच्या दुकानामुळे आरोपीचा व्यवसाय चालत नाही, असा त्याचा समज होता. त्यावरून आरोपीने फिर्यादीला कोयता आणि सत्तूरने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या डोक्यात, हातावर गंभीर दुखापत झाली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत