मुळशी ,दि. २७ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 25) सायंकाळी साडेपाच वाजता मुळशी तालुक्यातील माण येथे करण्यात आली.
पोलीस अंमलदार विक्रम कुदळे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बेकायदेशीरपणे बाळगली. याबाबत माहिती मिळाली असता हिंजवडी पोलिसांनी माण येथील जावडेकर कान्स्ट्रक्शन साईट जवळ छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी एक लाख 97 हजार 250 रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिला सीआरपीसी 41 (अ) (1) प्रमाणे नोटीस बजावली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत