उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकल्याबद्दल दोन वैद्यकीय व्यावसायिकांना दंड

0
182

पिंपरी, दि.२६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कक्षेत्रिय आरोग्य विभागाच्या वतीने मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी ते कोलोशीस रोडवर उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकल्याबद्दल दोन वैद्यकीय व्यावसायिकांकडून 70000 रुपयाचा तर डेंग्यू अळ्या आढळल्याबद्दल एका व्यवसायिकाकडून दहा हजार रुपयांचा दंड असा 80 हजार रुपयांचा दंड आज करण्यात आला सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे अमर सूर्यवंशी यांच्या पथकाने चिखली मोशी परिसरात ही कारवाई आज केली.

पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून रस्त्यावर कचरा टाकू नये असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे मंगलम क्लिनिक चिखली व श्री समर्थ क्लिनिक मोशी या दोन्ही वैद्यकीय व्यावसायिका ला प्रत्येकी 35 हजार रुपयांच्या दंड आकारण्यात आला.