मारहाण करून तरुणाच लुटले

0
1350

खराळवाडी, दि. २५ (पीसीबी) – दुचाकीवरून घरी चाललेल्या तरुणाला मारहाण करून लुटण्यात आले. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 23) सकाळी खराळवाडी, पिंपरी येथे घडली.

हंजाला कुरेशी (वय 20, रा. खराळवाडी), अल्ताफ शेख (वय 20), सैफ सय्यद (वय 20), साहिल अत्तार (वय 20), फैजान माजीद खान (वय 20), समीर वाघमारे (वय 20) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. इरशाद जाकीर कुरेशी (वय 32, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी सोमवारी (दि. 23) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुरेशी हे सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास आपल्या घरी दुचाकीवरून चालले होते. ते राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आले असता आरोपींनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील 600 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.