हिंजवडी , दि. २३ (पीसीबी) – विद्यापीठ चौक ते बावधन या मार्गावर बसने प्रवास करत असताना चोरट्यांनी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते साडेपाच या कालावधीत घडली.
याप्रकरणी महिलेने रविवारी (दि. २२) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते साडेपाच वाजताच्या कालावधीत विद्यापीठ चौक ते बावधन या मार्गावरून पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील ४४ हजार रुपये किमतीची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी चोरून नेली. बावधन येथे उतरल्या नंतर फिर्यादीच्या ही बाब लक्षात आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.