पोलीस असल्याची बतावणी करून महिलेचे दागिने पळवले

0
191

तळेगाव दाभाडे, दि. २३ (पीसीबी) – पादचारी महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी व्यक्तींनी फसवले. महिलेचे दागिने काढून कागदात बांधून ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने दागिने घेऊन दोघांनी धूम ठोकली. ही घटना शनिवारी (दि. 21) सकाळी साडेसात वाजता हरणेश्वरवाडी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी महिलेने दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रस्त्याने पायी चालत जात असताना एक व्यक्ती पाठीमागून चालत आला. त्याने फिर्यादीस थांबवून ‘मी पोलीस आहे. मला लोकांचे सोने चांदीचे दागिने चोरी जातात त्याचा तपास करण्यासाठी पाठवले आहे’ असे सांगून फिर्यादीस त्यांच्या कानातील कुड्या, गळ्यातील मण्याचे गंठन असे एकूण 54 हजार रुपये किमतीचे दागिने काढून ते एका कागदात बांधून देतो असे आरोपीने सांगितले. दरम्यान आरोपीने हातचलाखीने दागिने कागदात ठेवण्याचा बहाणा करून ते स्वतःकडे ठेऊन घेत महिलेला कागदाची पुडी बांधून दिली. त्यांनतर आरोपी त्याच्या साथीदाराच्या दुचाकीवरून निघून गेला. काही अंतर गेल्यावर फिर्यादीने कागद उघडून बघितला असता त्यात दागिने नव्हते. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.