दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी मोठी अपडेट दिली. त्यानुसार, या 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या 87 टक्के नोटा परत आल्या आहेत. तर मुदत संपल्यानंतर विभागीय कार्यालयात अनेकांनी दोन हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या. तरीही बाजारात 10 हजार कोटी रुपयांच्या नोटांचा ताळमेळ लागत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान एक हजार रुपयांच्या नोटेविषयी वृत्त समोर आले आहे. ही नोट पुन्हा चलनात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या वृत्तावर आरबीआयने खुलासा केला आहे.
10 हजार कोटींच्या नोटा कुठंय?
देशात दोन हजारांच्या 10 हजार कोटी रुपये मुल्याच्या नोटा कुठे आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या नोटा बाजारात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, या नोटा नेमक्या कोण वापरत आहे, हे समोर आलेले नाही. कारण किरकोळ व्यापारी, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक या नोटा बाजारात वापरत नाहीत, मग या नोटांचा वापर तरी नेमकं कोण करत आहे? का या नोटा दडवून ठेवण्यात आल्या आहेत?
आरबीआयचा दावा काय
एक हजार रुपयांच्या नोटेविषयी आरबीआयने भूमिका मांडली आहे. त्यानुसार एक हजार रुपयांची नोट चलनात आणण्याचा कोणताही प्लॅन नाही. तसेच बँक या नोटा छापण्याचा कोणताही विचार करत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आरबीआय एक हजार रुपयांची नोट सध्या छापणार नाही.
500 रुपयांची नोट अधिक मूल्यांची
भारतीय बाजारात सध्या व्यवस्थीत क्लॅश फ्लो आहे. 500 रुपयांच्या नोटांची उपलब्धता आहे. त्यामुळे हजार रुपयांची नोट छापण्याची गरज नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. देशात अजून 1000 रुपयांच्या नोटेचा काहीच फैसला झालेला नाही. 2000 रुपयांच्या नोटेची घरवापसी झाली आहे. त्यामुळे बाजारात 500 रुपयांची नोट अधिक मूल्यांची नोट ठरली आहे.
या नोटा चलनातून बाद
आरबीआयच्या संकेतस्थळानुसार, जानेवारी 1946 मध्ये पहिल्यांदा 500, 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. 1954 मध्ये 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा जानेवरी 1978 मध्ये पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या.
या ठिकाणी बदला गुलाबी नोट
2000 रुपयांची नोट बँका, त्यांच्या शाखेत जमा करण्याची मुदत संपलेली आहे. पण आरबीआयच्या विभागीय कार्यालयात 2000 रुपयांची नोट बदलविता अथवा जमा करता येते. देशभरात आरबीआयचे एकूण 19 विभागीय कार्यालये आहेत. या ठिकाणी 2000 रुपयांच्या नोटा बदलविता येतील.