पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी झालेल्या आंदोलनात तत्कालीन माहविकास आघाडी ( काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा ) सरकारच्या काळातील कंत्राटी भरतीच्या निर्णयाचा भाजपाकडून पिंपरीत जाहीर निषेध
तत्कालीन महाविकस आघाडी ( काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा ) सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेवून युवकांना बेरोजगार करण्याचा घाट घातला होता. तरुणांना शासकीय नोकरीपासून वंचित ठेवून तरुणांची स्वप्ने भंग केली, अशी टीका पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली.
शंकर जगताप पुढे म्हणाले की, कंत्राटी भरतीचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी ( काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा ) सरकारने घेतलेला होता. हा निर्णय घेऊन उबाठा सरकारने राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केले. स्वतःचे सरकार असताना स्वतःच निर्णय घ्यायचा आणि सरकार गेल्यानंतर स्वतःच आरोप करायचे, अशी दुहेरी भुमिका महविकास आघाडी घेत असून महायुती सरकारला बदनाम करण्याचा डाव आखत आहे. मात्र, रोल मॉडेल असलेल्या शिंदे, फडणवीस, पवार यांनी महाविकास आघाडीचा हा डाव उधळून लावला. महायुतीच्या सरकारने कंत्राटी भरतीचा हा निर्णय रद्द करून तरुणांच्या शासकीय नोकरीच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या आहेत. 2003 पासून सुशील कुमार शिंदे मुख्य मंत्री असल्या पासून राज्यात कंत्राटी भरती सुरु असून तिच कंत्राटी पद्धत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील सुरूच होती. आज महविकास आघाडीचे जे नेते या पद्धती विरुद्ध गदारोळ माजवत आहेत. त्याच महाविकास आघाडीच्या काळात या कंत्राटी कामगार भरतीला निविदा प्रक्रिया करून मान्यता देण्यात आली होती. त्यांच्याच या निर्णयाची अमलबजावणी होण्या आधीच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. महायुतीच्या या सरकारला शासकीय कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाची केवळ अमलबजावणी करावी लागली. आता याच अमलबजावणीच्या निर्णया विरुद्ध हे महाविकास आघाडीचे नेते बोंब मारत असून महायुतीच्या सरकारला नाहक बदनाम करत सुटले आहेत.
महाराष्ट्रात कंत्राटी भरतीसाठी जे दोषी आहेत, तेच गदारोळ करीत आहेत ही सत्य माहिती आम्ही जनतेसमोर या आंदोलनाच्या माध्यमातून आणत आहोत. महाविकास आघाडीच्या या फसव्या धोरणाचा आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या वृत्तीचा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करीत आहोत असे मत भाजप जिल्हा अध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केले.
भाजपा चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी ताई जगताप, माजी जिल्हा अध्यक्ष सदाशिव खाडे, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, शितल शिंदे यांनी देखील आपल्या मनोगत मांडताना ऊबाठा सरकारचा निषेध आणि महायुती सरकारचे अभिनंदन केले.
आंदोलनात सर्वांच्या निषेध मनोगता नंतर तत्कालीन महविकस आघाडी ( काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा ) सरकारच्या काळातील कंत्राटी भरतीच्या निर्णयाचा शासकीय GR पेटवून देऊन त्याची होळी करण्यात आली.
या आंदोलनास भाजप जिल्हा अध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह, चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, शितल शिंदे, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, नगरसेवक केशव घोळवे, मोरेश्वर शेडगे, शर्मिलाताई बाबर, उषा मुंढे, अश्विनी बोबडे, तेजस्वीनी कदम, माऊली थोरात, भीमा बोबडे, दिपक मोढवे, नामदेव पवार, शेखर चिंचवडे, पल्लवी वाघमोडे, रोहिणी रासकर, कमलेश बरवाल, कोमल शिंदे, राधिका बोर्लीकर, विजय शिनकर, दत्ता झुळूक, कैलास कुटे, संतोष तापकीर, कैलास सानप, प्रकाश जवळकर, देवदत्त लांडे, बाळासाहेब भूंबे, स्वाती गुरव, पराग जोशी, मुकेश चुडासमा, विशाल वाळुंजकर, दिपक नागरगोजे, रविंद्र नांदुरकर, गोरक्षनाथ झोळ, अजित कुलथे, दत्तात्रय यादव, सतीश नागरगोजे, संदीप गाडे, मनोज मारकड यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.