पिंपरी चिंचवड शहरातील ९५ टक्के खड्डे बुजविले, अवघे ४१७ खड्डे बाकी

0
736

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पावसाळ्यात पिंपरी चिंचवड शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली होती. महापालिकेने आठही प्रभागांतून सर्वेक्षण केले होते. एकूण ८ हजार २२९ खड्ड्यांपैकी १६ ऑक्टोंबर अखेर ७ हजार ८१२ खड्डे पूर्णतः बुजविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाळ्यातील खड्डे, पाणी, ड्रेनेज, विद्यृतविषय कामे आदींमुळे रस्ते खड्डेमय झाले होते. महापालिका प्रशासनाने त्याचे सखोल सर्वेक्षण केले. त्यात पूर्वीचे ६३३ खड्डे आढळले.

१ जून पासून नंतर पडलेले खड्डे ६ हजार ९२६ खड्डे तर गेल्या आठवड्यातील ६७० असे मिळून ८ हजार २२९ खड्डे होते. आजवर डांबराणे आणि कोल्डमिक्सने २ हजार ७४९ खड्डे बुजविण्यात आले. बीबीएम ने म्हणजे खडीने १२३३ खड्डे भरून घेतले. डब्लुएमएम ने २७३८ खड्डे बुजवले, तर पेव्हिंग ब्लॉक बसवून ४०७ खड्डे भरण्यात आले. मुरूम, खडी आणि सिंमेंट कॉन्क्रीटने ६८५ खड्डे रस्त्याच्या बरोबरीत भरून घेतले. अशा प्रकारे ७ हजार ८१२ खड्डे पूर्णतः बुजविले आणि अवघे ४१७ खड्डे बुजवायचे बाकी आहेत. अशा प्रकारे एकूण ९५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. महापालिका शहर अभियंता मकरंद निकम यांनी ही माहिती दिली.

महापालिकेने तयार केलेल्या तक्त्यामध्ये प्रभागनिहाय माहिती दिलेली आहे. त्यानुसार पावसाळ्यात सर्वाधिक खड्डे पडलेल्या प्रभागांत अनुक्रमे ड (१५५५), ब (१४९४) आणि क (११३९) यांचा समावेश आहे. कमी खड्डे असलेल्या प्रभागांत ई (३८२), अ (५८३), ग (५७८) यांचा अशी क्रमवारी आहे. महापालिकेच्या विविध प्रकल्पांमुळे खड्डे निर्माण झालेले खड्डे १०१६ होते, त्यातील ९५६ भरण्यात आले असल्याचे अहवालात म्हटले आहे.