शिवसेना कार्यकारिणी विस्तारात सहा नवीन नेते

0
331

विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांचा समावेश

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारिणीचा विस्तार केला. सहा नवे नेते तसेच उपनेते व संघटकपदी नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

‘मातोश्री’ निवासस्थानी काल सकाळी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नव्या नेत्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेतेपदी नियुक्ती करून शिवसेना नेते मंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.

नेते मंडळींत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मंत्री लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, युवानेते आदित्य ठाकरे, खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अनंत गीते, खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री भास्कर जाधव यांच्यासह नवीन नियुक्त नेत्यांमध्ये खासदार विनायक राऊत,
अनिल देसाई, माजी मंत्री अनिल परब, खासदार राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांचा समावेश आहे.

उपनेते म्हणून संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई), विजय (खंड्या) साळवी (कल्याण), संजय (बंडू) जाधव (परभणी)
शीतल देवरुखकर (मुंबई), शरद कोळी (सोलापूर) यांची नियुक्ती केली आहे.

निधीवाटपात भेदभाव दिसत नाही, सरकारची मनमानीही नाही; ठाकरे गटाला हायकोर्टाचा धक्का

सचिव पदावर वरुण सरदेसाई, सुप्रदा फातर्पेकर, साईनाथ दुर्गे यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.

संघटक पदावर अस्मिता गायकवाड (सोलापूर), शुभांगी पाटील (नाशिक), जान्हवी सावंत (कोकण), छाया शिंदे (सातारा), विलास वाव्हळ (मुंबई), विलास रूपवते (मुंबई), चेतन कांबळे (संभाजीनगर) यांना संधी देण्यात आली आहे.