माजी नगरसेवक काका लांडे यांचे निधन

0
352

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष काका उर्फ दत्तात्रय नारायण लांडे (वय- ६८) यांचे आज अल्पशा आजाराने सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. १९९२ मध्ये नेगरूनगर वार्डमधून अपक्ष म्हणून विजयी झाले होते. स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांना संधी मिळाली होती. पिंपरी चिंचवड शहरातील पीठ गिरणी चालक संघाचे ते संस्थापक होते.