यंदा कामचुकार, निष्क्रिय, भ्रष्ट कर्मचारी अधिकाऱ्यांना दिवाळी बोनस देऊ नका ! आयुक्तांना पाठवले पत्र

0
368


विषय – कामचुकार, निष्क्रिय, अकर्तव्यदक्ष ,कामात दिरंगाई करणारे ,भ्रष्ट कर्मचारी -अधिकारी कर्मचारी अधिकारी यांना दिवाळी बोनस न देणे बाबत .अर्जदार – युनुस रशीद पठाण (कोविड योद्धा सामाजिक कार्यकर्ता )
राहणार – थेरगाव पुणे 33 मोबाईल नंबर 84 21800889

महोदय ,आपल्या महानगरपालिकेत प्रशासनाचे हित जपण्यापेक्षा स्वतःच्या आर्थिक हित संबंध जपणे चे काम प्रशासन राजवटीमध्ये राजरोसपणे सुरू आहे .त्यातच अनधिकृत बांधकामांना अभय देणे ,तक्रार देऊनही कारवाही न करणे , तक्रारदाराची दिशाभूल करणे ,संबंधित तक्रारदाराची गोपनीय माहिती संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांना पुरवणे, दबावाला बळी पडणे, धाडसी कारवाई करण्यास घाबरणे ,कर्तव्यात कसूर करणे, बीटनिरीक्षक व इतर हस्तकांरवी अनधिकृत बांधकाम धारकांकडून आर्थिक देवाण-घेवाण करून भ्रष्टाचार करणाऱ्या अनुक्रमे 1) श्री अण्णा बोदडे (सहा आयुक्त) 2)शितल वाकडे (क्षेत्रीय अधिकारी ग प्रभाग) 3)सुचित्रा पानसरे (क्षेत्रीय अधिकारीअ प्रभाग )4)श्री. अमित सर (ज्युनिअर इंजिनिअर) 5)माधुरी पडवळ(जे ई) 6) श्री रामगुडे( जे ई झो.नि.पू) यांना दिवाळी बोनस देऊ नये .

उलट पक्षी यांच्या वाट्यातील बोनस इतर कर्मचारी अधिकारी यांना वाटप करावा कारण संबंधित अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामचुकार व निष्क्रिय वृत्तीमुळे त्यांना बोनस घेण्याचा नैतिक अधिकार नाही. आपण वर्धापन दिनाचे औचित्य साधून सानुग्रह बोनस देत आहात हे खरंच कौतुकास्पद आहे.जे अधिकारी कर्मचारी प्रामाणिकपणे ,कर्तव्यदक्षपणे काम त्यांना वाढीव बोनस देण्यासही हरकत नाही .पण जे कर्मचारी निष्क्रिय ,कामचुकार, कामात दिरंगाई करता व फक्त हजेरी भरण्याचे काम करतात अशांना बोनस देण्यात येऊ नये अशी आपणास विनंती आहे.

आपण निपक्षपणे कारवाई कराल अशी आशा बाळगतो. कळावे,
आपला विश्वासू
युनुस रशीद पठाण