महिन्याला २०० किलो ड्रग्जची निर्मिती

0
1083

पुणे, दि. १३ (पीसीबी) – ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा नाशिक इथल्या कारखान्यात महिन्याला २०० किलो ड्रग्ज बनवत होता. यांपैकी एक किलो ड्रग्जची किंमत १ कोटी रुपये आहे. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

भूषण पाटील आपल्या नाशिक इथल्या कारखान्यात आठवड्याला ५० किलो तर महिन्याला २०० किलो एमडी ड्रग्ज बनवायचा. या १ किलो एमडी ड्रग्जची किंमत १ कोटी रुपये आहे. त्यानंतर विविध भागात डिस्ट्रिब्युशन व्हायचं, असंही कळतं आहे.
दरम्यान, ससून परिसरात २ कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यांना काल सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांचा पीसीआर दिला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे, अशी माहिती डीसीपी अमोल झेंडे यांनी दिली.

नाशिकमध्ये ड्रग्ज बनवण्याचा कारखाना
ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण या ठिकाणी ९ महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. अद्याप तो पोलिसांच्या हाती आलेला नाही. पण चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचं समोर आलं आहे.