बँकेने सील केलेल्या घरात अतिक्रमण

0
195

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – कर्ज न फेडल्यामुळे बँकेने सील केलेल्या घरात कर्जदार व्यक्तीने अतिक्रमण केले. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी शाहूनगर, चिंचवड येथे उघडकीस आली.

गुरुप्पा एस हुंश्याल (वय 65, रा. शाहूनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हिमांशू जयस्वाल यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुरुप्पा यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंद्रायणीनगर शाखेतून 72 लाख रुपये कर्ज घेतले. त्यासाठी त्यांनी 23 नोव्हेंबर 2012 रोजी प्रियदर्शनी को ऑप हाऊसिंग सोसायटी मधील सदनिका क्रमांक सात ही मिळकत बँकेकडे गहाण ठेवली. दरम्यान गुरुप्पा यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली नाही. त्यामुळे बँकेने गुरुप्पा यांची सदनिका सील केली. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी बँकेचे रिकव्हरी एजंट सदर मिळकतीची पाहणी करण्यासाठी गेले असता गुरुप्पा यांनी सील केलेल्या सदनिकेत अतिक्रमण केले असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.