रसिकलाल एम. धारीवाल महाविदयालयात GPAT/NIPER/GATE स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व्याख्यान आयोजित.

0
262

पुणे, दि. ११ (पीसीबी) – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित रसिकलाल एम. धारीवाल इन्स्टट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च महाविदयालयाने दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षातील बी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी GPAT/NIPER/GATE परीक्षेसाठी मार्गदर्शक व्याख्यान आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकॅडमी ऑफ एक्सेलन्स चे संस्थापक मोहन राव अद्दी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात मोहन राव अद्दी यांचा सत्कार करून झाली. त्या नंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय जी. वालोदे यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे महत्वाविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याना GPAT/NIPER/GATE या परीक्षांविषयी अभ्यासक्रम, अभ्यासाच्या पद्धती व नोकरीच्या संधी या विषयावरती सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर फार्मसी च्या सर्व विषयांचा सखोल अभ्यास कसा करावा या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तृतीय वर्ष बी फार्मसी विद्यार्थिनी कु. शिवानी मडके आणि फाल्गुनी पेटारे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सहा. प्राध्यापक सौ. ज्योती चौधरी यांनी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय जी. वालोदे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
सदर कार्यक्रमासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रकाशचंदजी रसिकलालजी धारिवाल, चेअरमन मा. श्री शांतिलालजी लुंकड आणि ऑनररी जनरल सेक्रेटरी मा. श्री. ॲड. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.