पिंपरी, दि. १० (पीसीबी) : अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेला पिंपरी चिंचवड मध्ये शरद पवार गटाकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवार यांच्यासह शरद पवार गटातील अनेक दिग्गज नेते पिंपरी चिंचवडचे दौरे करू लागले आहेत. त्यात शरद पवार गटात इन्कमिंग देखील सुरू झाले आहे. आझम पानसरे यांच्या नंतर आता स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांचे आठ वर्ष स्वीय्य सहायक म्हणून काम पाहिलेले सतीश दत्तात्रय कांबळे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात नक्कीच फायदा होणार आहे.
पुण्यामध्ये एका कार्यक्रमात सतीश दत्तात्रय कांबळे यांनी आमदार रोहित पवार, शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि तुषार कामठे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला आहे. सतीश दत्तात्रय कांबळे यांच्या अनुभवाचा लक्ष्मण जगताप यांना फायदा झाला होता. आता त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने पवार गटाला याचा नक्कीच फायदा होईल.
अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट चांगलाच कामाला लागला आहे. जुने आणि नवे असे दोन्ही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. त्यांची संख्या देखील वाढू लागली आहे.
सतीश दत्तात्रय कांबळे यांची काम करण्याची पद्धत यामुळे शरद पवार गटाची ताकत वाढण्यास याचा फायदा होणार आहे. भाजपशी एकनिष्ठ असणारे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भोवती सर्व पिंपरी चिंचवडचे राजकारण फिरत होते. अनेक राजकीय डावपेच लक्ष्मण जगताप यांना फायद्याचे ठरले होते. त्यावेळी कांबळे हे त्यांच्या सोबतच होते. लक्ष्मण जगताप यांची कारकीर्द कांबळे यांनी पाहिलेली आहे. त्याचा फायदा शरद पवार गटाला होण्यास मदत होणार असल्याची चर्चा आहे.