टास्क च्या बहाण्याने तरुणाची दीड लाखाची फसवणूक

0
1015

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – टास्कच्या बहाण्याने तरुणाची ऑनलाईन पद्धतीने दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हि घटना चिंचवड येथे 9 ते 18 सप्टेंबर या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून 7749856329 या मोबाईल क्रमांक धरकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी यांना आरोपीने संबधित फोनवरून संपर्क करत विश्वास संपादन केला.टास्क देत ते पूर्ण करून घेतले. दरम्यान ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी पैसे घेत 1 लाख 62 हजार 680 घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी नीं पोलिसात तक्रार दिली. चिंचवड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.