राष्ट्रवादी कोणाची, आज होणार फैसला…!

0
265

नवी दिल्ली,दि.०९(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह नक्की कोणत्या पवारांच ? शरद पवारांच की अजित पवारांच या विषयी आज महत्वाच्या सुणावण्या होणार आहेत. शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात अजित पवार गटाविरोधातं दाखल केलेल्या याचिकेवर आज पहीली सुणावणी होणार आहे. तर पक्ष आणी चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात दुसरी सुनावणी होणार आहे.

शुक्रवारी निवडणूक आयोगात झालेल्या पहिल्या सुनावणी वेळी शरद पवार यांनी हुकूमशाही पद्धतीनं पक्ष चालवला असा आरोप अजित पवार गटाने केला होता. तर पक्षाचं चिन्ह गोठण्यात येऊ नये अशी शरद पवार गटाने मागणी केली होती.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नक्की कोणाची या प्रश्नाच उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला हवं आहे. तर दुसरीकडे अजित पवार आणि सोबतचे मंत्री अपात्र होणार का ? असा सवाल सगळ्यांनाच पडला आहे. या विषयीच्या महत्वाच्या सुनावण्या आज होणार आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्वाचा प्रश्न नुकताच उपस्थित केला होता. यावेळी निवडणूक आयोगाचा पेपर आधीच फुटला आहे पेपर देण्याआधीच यांना निकाल कसा कळला? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. यामुळे आजच्या दोन्हीही सुनावण्या खूप महत्वाच्या आहेत.