गॅस चोरट्यांमुळे मोठा स्फोट, बॉम्ब सारखे नऊ स्फोट, इमारती हादरल्या तीन स्कूल बसेस जळून खाक

0
820

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवडमधील ताथवडे परिसरात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. गॅस चोरी करत असताना टँकरचा स्फोट झाला आहे. यात तब्बल ९ टाक्यांचा स्फोट झाला आहे. जेथे आग लागली तेथून जवळच जेएसपीएम कॉलेज, विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आणि रहिवाशी बिल्डिंग आहेत, त्यासुध्दा हादरल्या. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही, पण तीन स्कूल बस जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, या निमित्ताने गॅस चोरीचा मोठा काळाबाजार समोर आला आहे.टँकरमधून गॅसची चोरी होत होती. त्यावेळी एकामागे एक गॅस टाक्यांचा स्फोट होऊ लागला. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील लोक घाबरले. रात्री झोपेत असताना उठून अनेक जण रस्त्यावर आले. या परिसरात शाळा, कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हॉस्टेलही आहे. त्यामुळे विद्यार्थीही बाहेर आले. पिंपरी चिंचवड येथील ताथवडे येथे ही घटना घडली आहे.गॅस चोरीचा काळाबाजार समोरभीषण आग ही गॅस चोरीच्या काळाबाजाराने लागल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. नऊ टाक्यांचा स्फोट झाल्यामुळे ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. त्याचवेळी आगीच्या रौद्ररूपामुळे गॅस चोरी करणाऱ्या लोकांनी घटनास्थळावरुन पळ काढला. गॅस टँकरचा स्फोट झाला त्या परिसरात शाळा, महाविद्यालये आहेत. यामुळे या भागांत अनेक हॉस्टेलसुद्धा आहेत. सुदैवाने स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या कचाट्यात परिसरातील घरे आली नाहीत. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.