कारची काच फोडून रोख रक्कम व कागदपत्रे चोरीला

0
1178

भोसरी , दि. ६ (पीसीबी) पार्क केलेल्या कारची काच फोडून कारमधून रोख रक्कम व कागदपत्रे चोरली आहेत.ही घटना गुरुवारी ( दि.5) भोसरी येथे घडली.

याप्रकरणी विजय पुंडलिक सोनवणे (वय 52 रा पिंपळे सौदागर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी भोसरीतील मंकीकर हॉस्पिटलच्या समोर त्यांची कार पार्क केली होती. यावेळी चोरट्याने कारच्या खिडकीचा काच फोडून कार मध्ये ठेवलेले 48 हजार रुपये रोख व कागदपत्रांची बॅग आसा ऐवज चोरून नेला. फिर्यादी परत आले असता हा सारा प्रकार निदर्शनास आला. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.