‘स्वच्छता ही सेवा’ हे राष्ट्रीय स्तरावरील एक क्रांतिकारी उपक्रम – शत्रुघ्न काटे

0
310

पिंपरी,दि.०१ (पीसीबी) -राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला प्रतिसाद देत आज १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते ११ या एक तासाच्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने व नागरिकांच्या सहकार्याने पिंपळे सौदागर येथील सेव्हन स्टार लेन ते कोकणे चौक लिनीयर गार्डन याठिकाणी स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात आले .

महात्मा गांधीजींचे स्वच्छ भारत देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी “स्वच्छता ही सेवा” अशा अभियानांची सुरुवात केली गेली आहे. २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी त्यांना स्वच्छतेच्या माध्यमातून स्वच्छान्जली अर्पण करण्यात आली. प्रभागामध्ये मनपाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह स्वयंसेवी संस्था, परिसरातील नागरिकांद्वारे स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले.

जोपर्यंत आपली घरे आणि रस्ते अस्वच्छ राहतील तोपर्यंत आपण स्वतःला सुसंस्कृत आणि सुसंस्कृत म्हणवू शकत नाही.स्वच्छतेची जबाबदारी केवळ सरकार किंवा प्रशासनाची नाही. यामध्ये प्रत्येक जागरूक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे.यासोबतच नागरिकांनी आपले घर,परिसर, कॉलनी या सर्व ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेउन आपली जबाबदारी दर्शविल्यास सहजरित्या शहर स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ राखले जाईल, असा विश्वास व्यक्त करीत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी करून घेत जनजागृती केली.

या स्वच्छता अभियानवेळी नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे , नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे, पालिका अधिकारी व कर्मचारी , सैन्य दलातील अधिकारी , अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय शिक्षक व शाळकरी मुले,जेष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट, पालिका आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी , परिसरातील नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.