तनपुरे फाउंडेशनच्या मूर्तीदान, निर्माल्यदानालाही घरकुल वसाहतीत मोठी प्रतिसाद

0
254

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन संचलित पोलिस मित्र, पर्यावरण मित्र संघटना व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने गणेशोत्सव काळात शहरातील विविध ठिकाणी गणपती बाप्पा यांचे नदीत विसर्जन न करता पर्यावरण व नदी स्वच्छता अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने घरकुल येथे विसर्जन हौद या ही वर्षी करण्यात आला. या सर्व सेवा कार्यात कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन चे 70 ते 75 सभासद निर्माल्य दान. मूर्ती दान या साठी गेले अनेक वर्ष या कार्यात सहभागी होत असतात. या ही वर्षी विविध विसर्जन घाट, विसर्जन हौद या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सेवा कार्य केले. काल गणेशोत्सव अनंत चतुर्दशी 10 वा दिवस या दिवशी शहरातील मोठ्या प्रमाणात मंडळ. घरगुती गणपती या दिवशी विसर्जित केले जातात. या ही वर्षी घरकुल येथे मोठ्या प्रमाणात भक्तीमय व अतिशय शिस्तबद्ध नियोजन कै तुकाराम तनपुरे फाऊंडेशन संघटनेच्या व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने काल घरकुल येथील विसर्जन हौद येथे सकाळी 9 ते रात्री 2 पर्यंत विविध मंडळ घरगुती गणपती बाप्पा असे सर्व मिळून 6985 मूर्ती संकलन करण्यात आले. त्याचबरोबर 5 गाड्या निर्माल्य जमा करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना देण्यात आले. तसेच स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात आली.

काल घरकुल येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले. या दिवशी श्री भवरे साहेब. श्री. राजेश माने साहेब, श्री भाऊसाहेब वारे साहेब, श्री. काटे सर यांनी विशेष लक्ष्य दिले.
विशेष सहकार्य पोलीस प्रशासन चिखली पोलिस ठाणे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर काटकर सर व एल आय बी चे श्री. दिनेश ढवळे सर व श्री शिंदे साहेब यांचे लाभले.
या सोहळ्यासाठी संघटनेच्या वतीने जे सभासद दिवस रात्र सेवा कार्य करत होते, शहरातील विविध ठिकाणी त्या सर्वांना नाष्टा व पाणी संघटनेचे उपाध्यक्ष श्री वासुदेव काळसेकर यांनी विविध घाटावर जावून वाटप केले.
अतिशय भक्ती मय असा सोहळा पार पाडत, तनपुरे फाउंडेशन संचलित पोलीस मित्र पर्यावरण मित्र विविध विभागाने एक आदर्श निर्माण केला. या सेवा कार्यात संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष श्री. विजयकुमार आब्बड, सचिव श्री. लक्ष्मण शिंदे, श्री. कांतीलाल हरीणखेडे, श्री. किसन शेवते श्री. वासुदेव काळसेकर, श्री. प्रताप सोनवणे, श्री नितीन मोरे, धनंजय आव्हाड, संतोष शिंदे, कुणाल बडीगेर, चेतन चव्हाण, राजु माने, श्री. शैलेश रोकडे, मुकेश तोमर, शरद शिंदे, श्री. नयनभाई तन्ना, मयूर मडीवाल, श्री. हार्दिक जानी, श्री मुकेशभाई चुडासमा, ज्ञानप्रकाश शर्मा. संजयकुमार ईशी. तुकाराम साठे. श्री. अरबाज शेख, दत्तात्रय देवकर, श्री अभिशेख लमझाने. सौ विद्याताई तांदळे, पदाधिकारी व सर्व सभासद व महिला भगिनी उपस्थित होते. या सेवा कार्यात संघटनेच्या सभासद यांनी वाहतूक नियोजन, निर्माल्य दान, मूर्ती दान संकलन करून दिवसभर सेवा कार्य केले. काल अनंत चतुर्दशी दिवशी जास्तीत जास्त सभासद व महिला भगिनी या सेवा कार्यात सहभागी झाले.
सर्व स्तरांवरून सर्वांनीच या कार्यात सहभागी होऊन सर्वांचा हातभार मिळाल्याने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यास सहकार्य मिळाले. आपण गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी प्रार्थना करू या. बाप्पांच्या विसर्जन सोहळ्यास सर्वांचे सहकार्य मिळाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व सर्वांना धन्यवाद.
गणपती बाप्पांच्या कृपेने आपली सर्वांची साथ अशीच राहो, असे कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशनच्या वतीने, अध्यक्ष श्री. अशोक तनपुरे यांनी म्हंटले आहे.