चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – टास्कच्या बहाण्याने महिलेकडून 91 हजार रुपये घेत तिची फसवणूक करण्यात आली. मोठी रक्कम मिळणार या आमिषाने महिलेने गुंतवणूक केली मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसात धाव घेतली.
ही घटना 10 सप्टेंबर रोजी पूर्णानगर, चिंचवड येथे घडली. महिलेच्या फिर्यादीवरून 7264903832 या व्हाटस अप क्रमांक धारक आणि https://tudksna.com?invite=nqpqz#/register या लिंक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीसोबत सोशल मिडीयावर संपर्क केला. फिर्यादीला कामाचे टास्क देऊन ते पूर्ण केल्यास कमिशन देतो, असे सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादीने 91 हजार 700 रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी सांगितल्या प्रमाणे टेलिग्रामवर मेसेज देखील पाठवले. मात्र त्यांना कोणतेही कमिशन अथवा त्यांनी गुंतवलेली रक्कम मिळाली नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत