जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला कोयता व फरशिने मारहाण

0
979

चिखली, दि. २०(पीसीबी)- जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला कोयता व फरशीने मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.18) चिखली येथे घडली.

प्रसाद प्रभाकर लामजणे (वय 26 रा चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या फिर्यादीवरून पोलिसांनी अभि धायगुडे व शुभ्या (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे चिखली येथील एका टपरी जवळ थांबले होते. यावेळी आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीला लोखंडी कोयत्याने मारहाण करत जखमी केले. यावेळी फिर्यादी यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने रस्त्यावर पडलेली फरशी मारून फिर्यादी यांना गंभीर जखमी केले. यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या हातातील कोयता हिसकावून घेतला असता दोन्ही आरोपी दुचाकीवरून पळून गेले. मारहाण झाल्यानंतर फिर्यादी यांनी चिखली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.