पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून उद्योगआणि व्यापार सेल तर्फे राज्य सरकारने ‘ सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण’ आदेशाविरोधात पिंपरी चौकात डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळ्याशेजारी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कंत्राटी जीआर च्या प्रति फाडून ‘ भाजप ‘ असे लिहिलेल्या कचऱ्याच्या डब्ब्यात फाडून फेकण्यात आल्या.उद्योग आणि व्यापार सेल अध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे म्हणाले की या कामासाठी 9 कंत्राटदार सुद्धा फायनल केले आहे. ते सहा लाख नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत. यामुळे या कंत्राटदारांना 15000 कोटी मिळणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील म्हणाले की या जीआर मुळे संविधानाने दिलेला आरक्षणाचा अधिकार संपुष्टात येणार आहे. तसेच आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीला सुद्धा याचे काम देण्यात आले आहे. हा जीआर मागे घेण्यात यावा याची मागणी देवेंद्र तायडे, काशिनाथ जगताप आणि प्रदेश सरचिटणीस राजन नायर यांनी केली. यावेळी सामाजिक सेल अध्यक्ष मयूर जाधव, सुदाम शिंदे, राजू खंडागळे, पोपट पडवळ, बापू सोनावणे, ऍड सरोदे, राजेश हरगुडे, संतोष माळी
अंकुश बिरादार, रोहन वाघमारे, राहुल धनवे, निलेश पुजारी आदी उपस्तिथ होते.