अयोध्येत श्रीराम मंदिराखाली पुरातन मूर्ती आणि स्तंभ मिळाल्याचं समोर

0
432

योध्या, दि. १३ (पीसीबी) – अयोध्येतील श्रीराम मंदिराखाली अनेक पुरातन मूर्ती आणि स्तंभ मिळाल्याचं समोर आलं आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्स (ट्विटर) पोस्ट करत याबाबत माहिती दिली. मंदिरासाठी खोदकाम सुरू असताना या मूर्ती आढळल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मंदिराचे अवशेष

चंपत राय यांनी याबाबत अधिक माहिती दिली नाही. मात्र, त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमधून हे एखाद्या मंदिराचे अवशेष असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये कित्येक मूर्ती आणि मंदिराचे स्तंभ दिसून येत आहेत. राम मंदिरात येणाऱ्या भाविकांना हे पुरातन अवशेष पाहता येणार आहेत. यासाठी हे अवशेष एका विशेष गॅलरीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. सोबतच याबाबत अधिक माहिती देखील देण्यात येणार आहे. लाईव्ह हिंदुस्तानने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.