मोरोक्कोतील विध्वंसक भूकंपामुळे २००० वर नागरिकांचा मृत्यू

0
329
A view shows a damaged building on the road between Amizmiz and Ouirgane, following a powerful earthquake in Morocco, September 9, 2023. REUTERS/Ahmed El Jechtimi

विदेश,दि.१० – शुक्रवारी मध्यरात्री मोरक्कोमध्ये एका विध्वंसक भूकंपामुळे हजोरो लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या आता वाढली असून ती 2000 च्या पुढे गेली आहे. भूकंपामुळे मोरोक्कोमध्ये मोठे नुकसान झाले आहे, या हाणीमधून सावरण्यासाठी मोरोक्कोला सावरण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे रिपोर्टनुसार मोरोक्कोमध्ये ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

या भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेशच्या नैऋत्येस ७२ किलोमीटर अंतरावर होता. मोरक्कोसरकारने सांगितले की, भूकंपात आतापर्यंत 2012 लोकांचा मृत्यू झाला असून 2059 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 1404 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोरोक्कोमध्ये कॅसाब्लांका आणि राबात या शहरांमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे लोकांनी सांगितले. एका वृद्ध महिलेने सांगितले की, ते झोपले असताना अचानक त्यांना दरवाजा वाजल्याचा आवाज आला. यामुळे घाबरले आणि लगेच घराबाहेर पळाले. उत्तर आफ्रिकी देश मोरोक्कोमध्ये गेल्या 120 वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान परदेशी नेत्यांनीही मोरोक्कोमध्ये ठार झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारीच G20 बैठकीत मोरोक्कोबद्दल शोक व्यक्त केला होता. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे दुःख व्यक्त केलं आहे. मोरोक्को सरकारला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही शोक व्यक्त केला आहे. पोप फ्रान्सिस यांनीही शोक व्यक्त केला आहे. अल्जेरियात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, तेथे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.