स्मिता झगडे यांची सातारा येथे सहआयुक्त म्हणून बदली

0
399

महाराष्ट्र, दि. ८ (पीसीबी) – महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता झगडे यांची सातारा येथे सह आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी (दि. ६) सप्टेंबर रोजी जारी केला आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त-१ पदावरून सुरू असलेला प्रदीप जांभळे-पाटील आणि झगडे यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या एलबीटी विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांना पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली होती. याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव कुलकर्णी छापवाले यांनी दि.१३ सप्टेंबर २०२२ रोजी काढले होते. मात्र, झगडे यांच्याकडे आयुक्त शेखर सिंह यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार दिला नाही. दहा दिवसांनंतर त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्तपदी वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची २२ सप्टेंबर रोजी दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली. यामुळे झगडे यांनी मॅटमध्ये धाव घेतली. आता झगडे यांची सातारा येथे बदली झाल्याने वाद संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, झगडे यांच्याकडे दिलेल्या विभागाचे त्या कामकाज करत नसून त्यांना पालिकेने शिस्तभंगाची नोटीसही दिली होती. त्यानंतर झगडे यांना शासन सेवेत परत घ्यावे, असे पत्रच आयुक्त सिंह यांनी दिले होते.