महिलांना ३३ टक्के आरक्षण संसदेत विधेयक मंजूर होणार

0
259

पुणे, दि. ७ (पीसीबी) – ‘‘भाजप एकमेव पक्ष आहे, जो महिलांना पक्ष नेतृत्वात ३३ टक्के आरक्षण देत असून, त्यांना राजकारणात अधिकाधिक मजबूत स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न करीत आहे. यामुळे लवकरच संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल,’’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांनी केले.
कोरेगाव पार्क येथील अब्दुल कलाम आझाद मेमोरिअल हॉलमध्ये कला भारत आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजतर्फे ‘आर्थिक नियोजनाद्वारे सक्षमीकरण’ या विषयावर कला भारत संस्थेच्या अध्यक्षा उषा बाजपेयी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या प्रसंगी राज्य महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी, एनएसई एम्पॉवर एज्युकेशनच्या अल्पा शहा, सामाजिक कार्यकर्त्या माधवी भुता, अॅड. रश्मी कांबळे, एकता सेवा प्रतिष्ठानच्या स्वाती शेरला आदी उपस्थित होत्या.

श्रीनिवासन म्हणाल्या, ‘‘अनेक महिला कमावतात, पण आर्थिक स्वातंत्र्य नसल्यामुळे गुंतवणूक कशी व कुठे करावी हे माहीत नसते, त्यामुळे हा उपक्रम घेतला आहे. मनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेला जगात स्वावलंबी करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.’’