उद्या ‘लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ विशेषांक प्रकाशन सोहळा

0
381

पिंपरी, दि.२ (प्पीसीबी) – सांस्कृतिक वार्तापत्र पुणे निर्मित ‘लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी व सांस्कृतिक वार्तापत्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निगडीतील कॅप्टन जी एस कदम सभागृह सावरकर मंडळात उद्या दि.३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर संबोधित करणार असून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के.विश्वनाथन नायर, जागरण पत्रिका आयामाचे अजय तेलंग यांच्यासह अनेकविध मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक मिलिंद शेटे व आयोजकांनी केले आहे.