तळेगाव पोलिसांनी पकडला पावणे चार लाखांचा विदेशी मद्यसाठा

bpcauthor bpcauthor
1 Min Read

तळेगाव दाभाडे , दि. २९ (पीसीबी)- तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई करत तीन लाख 74 हजार रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 28) दुपारी पावणे चार वाजता जुना पुणे मुंबई महामार्गावार इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे करण्यात आली.

मधुकर मोतीराम शिरसाट (वय 40, रा. प्रेमलोकपार्क, चिंचवड. मूळ रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विकास तारू यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अवैधरीत्या गोवा राज्यातून विदेशी मद्यसाठा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणला. याबाबत तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत तीन लाख 74 हजार 200 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. आरोपीला सीआरपीसी प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article