अजित पवार यांना मुख्यमंत्री कऱण्यासाठीच आम्ही एकत्र

0
164

सातारा,दि. २९ (पीसीबी)- माण तालुक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची सभा झाल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली. यावेळी रामराजे म्हणाले, आम्ही १९९९ ला खासदार शरद पवार यांना पंतप्रधान करण्याची स्वप्ने बघितली होती. त्याप्रमाणे आता अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

दहिवडी (ता. माण) येथे नुकताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, खासदार शरद पवार साहेबांनी विकासाचे राजकारण शिकवले. भविष्यातील राजकारण विकासाचे ठेवण्यासाठी आम्ही हा कटू निर्णय घेतला आहे. २१ शतकात सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला देशातील प्रमुख राज्य करण्याचा ध्यास अजित पवार यांनी ठेवला आहे.

सातारा लोकसभेबाबत खासदार उदयनराजेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, लोकांचा आग्रह लक्षात…
१९९९ ला आम्ही शरद पवारांना पंतप्रधान करण्याची स्वप्ने बघितली. त्याप्रमाणे अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यावेळी रामराजे यांनी संवाद साधताना कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.

बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही गावागवात पोहोचवू. सध्या माण तालुक्यात टंचाई परिस्थिती पाहता तातडीने टंचाई जाहीर करावी, अशी मागणी केली. तसेच आता रामराजेंनी जिल्हयाच्या राजकारणात न थांबता दिल्लीतील राजकारणात जावे, अशी भावना व्यक्त केली.