संत गाडगेबाबा महाराज जेष्ठ नागरिक व मराठवाडा जनविकास संघ महाराष्ट्र राज्य वतीने वृक्षारोपण

0
333

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – झाडे लावा, झाडे जगवा संदेश प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी संत गाडगेबाबा महाराज जेष्ठ नागरिक संघ व मराठवाडा जनविकास संघ पिंपळे गुरव यांच्या वतीने पेरू, चिकू, वड, सिताफळ, पिंपळ या पर्यावरणपूरक रोपांचे काशीदनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, अमोल लोंढे, रोहित जाधव, शिवाजी भोईर, सुरेश दिघे, पांडुरंग भोसले, अनंत चिंचोले, प्रकाश चिटणीस, चांदमल सिंगवी, अनंत जाधव, अंजली कुलकर्णी, कमल पवार, साळूताई इसटे, कांतीलाल कानगुडे, दत्तात्रय वाणी आदी उपस्थित होते.

श्रीकृष्ण फिरके म्हणाले, की आजच्या युवकांनी व तरुणांनी काळाची गरज लक्षात घेता पर्यावरणासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. मात्र, ते काम वयाची सत्तर वर्षे ओलांडलेल्या व्यक्ती करीत आहेत, याचे तरुणांनी अनुकरण केले पाहिजे. अरुण पवार म्हणाले, की आज ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता झाडे लावून ती जगविणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाड लावून त्याचे पर्यावरण संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे. आज मराठवाडा जनविकास संघाने राज्यभरात पंचवीस हजाराहून अधिक वृक्षांची लागवड करून ती संरक्षक जाळीच्या माध्यमातून जपली आहेत.