खुन्नस दिली म्हणून तरुणाला मारहाण करत धमकी दोघांना अटक

0
984

रहाटणी, दि. २५ (पीसीबी) – खुन्नस देऊन बघितले या कारणावरून चौघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.21) रहाटणी येथे घडली.

या प्रकरणी गुरुवारी सौरभ विकास साठे (वय 22रा .राहटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी कैलास बंजारी (वय 21) आकाश कांबळे (वय 25) दोघे रा. रहाटणी यांना अटक केली असून दीपक मिसाळ व सनी गवारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक व सनी यांनी फिर्यादीला खुन्नस देतो का या कारणावरून शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मारून टाकीन म्हणत दीपक यांनी कोयत्याने फिर्यादीवर वार केला मात्र फिर्यादी यांनी तू चुकवला. यावेळी आरोपींनी फिर्यादीला पोलिसात तक्रार केली तर तुझा खून करेन अशी धमकी दिली, यावरून फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार केली असून वाकड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.