भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणीत अनुप मोरेंना पुन्हा संधी,तेजस्विनी कदम आणि अजित कुलथेंचा समावेश

0
327

पिंपरी, दि.१० (पीसीबी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर्षी दोन मे रोजी जाहीर केलेल्या आपल्या पावणेचारशे जणांच्या जंबो कार्यकारिणीत आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवडला झुकते माप दिले. शहरातील पदाधिकाऱ्यांची संख्या दुप्पट म्हणजे आठवर त्यांनी नेली. त्याची पुनरावृत्ती ‘भाजयुमो’च्या नुकत्याच (ता.३) जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीतही झाली आहे.

‘भाजयुमो’म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी आपली नवी टीम तीन ऑगस्ट रोजी जाहीर केली. त्यात पिंपरी-चिंचवडमधील तिघांचा समावेश आहे. यापूर्वीच्या या कार्यकारिणीत अनुप मोरे हे (सरचिटणीस) एकमेव पिंपरी-चिंचवडकर होते. ते नव्या टीममध्ये त्याच पदावर आहेत. त्यांच्याजोडीला तेजस्विनी कदम आणि अजित कुलथे या पिंपरी-चिंचवडमधील आणखी दोघांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. त्यांना थेट सचिव म्हणजे पदाधिकारी करण्यात आले आहे.
७२ जणांच्या ‘भाजयुमो’च्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत सात सरचिटणीस, तर १९ उपाध्यक्ष , तर १७ सचिव आहेत. सोशल मीडिया संयोजक, सहसंयोजक, क्रीडा विभाग संयोजक, विद्यार्थी विभाग संयोजक, कार्यालय मंत्री आणि सह कार्यालय मंत्रीही आहे. उर्वरित सदस्य आहेत. पक्षाच्या प्रदेशच्या फादर बॉडीत महिलांना कमी स्थान दिल्याची पुनरावृत्ती, मात्र या युवा टीममध्ये टाळण्यात आली आहे. तेथे युवतींना योग्य प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.

त्यांनी शहरासह प्रदेशवरही कामाचा ठसा उमटवलेला आहे. ते पक्षाच्या युवा वॉरिअर्सचे प्रदेश संयोजकही आहेत. तर, तेजस्विनी कदम यांनी शहर पातळीवर विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळलेल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने केलेली कामे जनतेला जाऊन सांगणार आहे, अशी प्रतिक्रिया नियुक्तीवर या तिघांनीही दिली.