कोयता घेऊन वृद्धाचा भर रस्त्यात राडा; दोघांना दिली जीवे मारण्याची धमकी

0
845

पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- एका वृद्धाने कोयता घेऊन रस्त्यावर दहशत निर्माण केली. तसेच दोघांना कोयत्याने कापून टाकीन, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 7) दुपारी तीन वाजता मोई गावात घडली.

विठोबा निवृत्ती गवारी (वय 62, रा. मोई, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकांरी प्रसाद नवनाथ गवारे (वय 19, रा. मोई, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून मोई गावातून दत्तनगरच्या दिशेने जात होते. त्यांना आरोपीने रस्त्यात अडवले. कोयता घेऊन फिर्यादीस शिवीगाळ केली. तू रस्त्याने जायचे नाही, असे म्हणून कोयता घेऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी आरोपी अंगावर आला. तुला कोयत्याने कापून टाकीन, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांचे चुलते कुंडलिक काशिनाथ गवारी यांना देखील शिवीगाळ करून कोयत्याने कापून टाकीन, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.