युट्युब वरील व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील, या आमिषाने सव्वादोन लाखांची फसवणूक

0
414

पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- युट्युब वरील व्हिडीओ लाईक, सबस्क्राईब केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून दोन लाख 25 हजार 600 रुपये घेत फसवणूक केली. ही घटना 2 एप्रिल ते 3 एप्रिल 2023 या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

मनीष भगवानदास कृपलानी (वय 34, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 16822932635 हा मोबाईल क्रमांक धारक आणि A1081 INDIA PROQUEST PART TIME JOB नावाचा टेलिग्राम ग्रुप बनवणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी सोशल मिडियाद्वारे संपर्क करून आरोपींनी युट्युबवर पार्ट टाईम जॉबबाबत ऑफर असल्याचे सांगितले. व्हिडीओला लाईक आणि सबस्क्राईब केल्यास वेळोवेळी बोनस मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यानुसार फिर्यादीस एका टेलिग्राम ग्रुपवर मध्ये जॉईन करण्यात आले. तिथे त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख 25 हजार 600 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.