नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी)- 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रात होईल, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आज एनडीएची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. त्यावरून संजय राऊतांनी सडकून टीका केली. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय होईल? याबाबत भाजपला विश्वास राहीलेला नाही. त्यामुळे हा पक्ष तोडा, तो पक्ष फोडो असे राजकारण चालू आहे. एनडीएची आठवण भाजपला झाली आहे. मात्र, आता भाजपने कितीही प्रयत्न केला तरी 2024 मध्ये एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्रातील
एनडीएचा पराभव हा ऐतिहासिक असले.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राप्रमाणेच बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तेलंगणातही एनडीएचा मोठा पराभव होईल. त्यामुळे आता एनडीएने महाराष्ट्र सदनात जास्तीत जास्त बैठका घ्यायला हव्यात. मोदींच्या मार्गदर्शनाची त्यांच्या घटकपक्षांना आता जास्त गरज आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला.
संजय राऊत म्हणाले, पोर्तुगीज, ईस्ट इंडियाचे व्यापारी आले–गेले तसे सध्याचे धनिक व शेठ मंडळांचे सावटही दूर होईल. फडणवीस म्हणतात की, श्री. अमित शहा यांना महाराष्ट्र चांगला कळतो. बहुधा म्हणूनच ते मुंबई व महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला धजावत नाहीत. व्यापारी बहुमत विकत घेतात, पण जनतेस सामोरे जात नाहीत. हे जुलमाचे व्यापारी राज्य लवकरच उलथे पडेल. देशात तसेच वारे वाहत आहेत.
महाराष्ट्राविरोधात डावपेच
संजय राऊत म्हणाले, मुंबईचे महत्त्व कमी व्हावे, मुंबई कमजोर पडावी यासाठी हे ‘शेठ मंडळ’ नेहमीच पडद्यामागून कारस्थाने करीत आले. गेल्या आठ-नऊ वर्षांत या कारस्थानांना जास्तच विष चढले आहे. कारण देशाची सूत्रे गुजरातच्या ताब्यात असून मुंबई-महाराष्ट्र कमजोर करण्याच्या डावपेचांना निरंकुश सत्तेमुळे बहार आली आहे.
संजय राऊत म्हणाले, अमित शहा हे मुंबई महापालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार नाहीत. प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईची लूट करीत आहेत. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे भाजपला वाटते. त्यामुळे भाजप कोंबडीच मारून खात आहे.