पवना धरण भरल्याने दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा; मा. नगरसेविका सीमाताई सावळे यांची मागणी

0
793

पिंपरी, दि. ३(पीसीबी) – पुणे जिल्ह्यात व विशेष करून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. आज 3 ऑगस्ट 2023 रोजी पवना धरण सुमारे ९२.२७ % टक्के क्षमतेने भरले आहे. पिंपरी- चिंचवड शहराची तहान भागवणारे पवना धरण भरल्याने शहरवासियांची पाण्याची चिंता मिटलेली आहे. पवना धरणातील विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये आज सुमारे १४०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पुढील काही दिवस अधिकचा पाऊस कोसळू शकतो, अशी शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पवना धरणाच्या सांडव्यावरून अधिकच पाण्याचा विसर्ग होणार आहे.

​२५ नोव्हेंबर २०१९ ला पिंपरी चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. अपुरा, अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबाबत शहरातील नागरिकांच्या तक्रारी सातत्याने सुरु आहे. सध्यस्थितीत पवना धरण भरले असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अशा स्थितीत शहरावर लादण्यात आलेली पाणीकपात रद्द करून दररोज पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा अशी मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष तसेच माजी नगरसेविका सीमाताई सावळे यांनी केली आहे.