जाहिरातबाज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ३२ लाख शेतकरी वंचित – काशिनाथ नखाते .

0
288

लाखो शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर

पिंपरी दि.२९(पीसीबी) – पंतप्रधान किसान योजना निकष नमो शेतकरी महासन्मान योजनेस लागू केल्याने महाराष्ट्र राज्यातील सुमारे ३२लाख ३७ हजार शेतकरी या लाभापासून अद्याप वंचित आहेत, शेतकरी अनेक संकटाने राज्यातील लाखो शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकार६०००रू.व राज्य सरकार६०००रू. लाभ देण्याची केवळ घोषणा करण्यात आली व तरतूद केल्याची जाहीर करण्यात आली कागदो पत्री घोषणा करून शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकार फसवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज व्यक्त केली.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन व कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की सदरच्या योजनेतून २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० रू. अर्थसाह्य दिले जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केले नसल्याने यात लाभार्थ्यांना लाभ घेता येत नाहीत. काल प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान योजनेला तील ३२ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागणार असल्याची माहिती राज्य सरकारने एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात कालच विधान परिषदेत दिली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून नुकतेच एका सर्वेक्षणात आढळलेली धक्कादायक माहिती म्हणजे मराठवाड्यातील सुमारे १ लाख ५ हजार ७५४ शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची खळबळकजनक माहिती समोर येत आहे. मराठवाड्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठ जिल्ह्याचा सर्वेक्षण केला होता. मागील दहा वर्षांमध्ये दहा हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत मराठवाड्यासह महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे नापिकी, पाणी कमतरता, निसर्गाची अवकळा,बोगस बियाणे,त्याचबरोबर लागवडीमुळे झालेला कर्जबाजारीपणा असे अनेक संकटे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घडत आहेत. शेतकऱ्यांना अनेक गंभीर प्रकारचे आजार असून त्यांना औषधा उपचारासाठी खर्चही करू शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाऊस तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट अशा अनेक संकटातून शेतकऱ्यांना जावे लागत आहे. शेतकऱ्यांना संकटकाळी दिलासा देण्याचा कोणताही कार्यक्रम सरकारकडे नाही . शेतकरी आत्महत्यांचे गंभिर्य नाही सरकारचे शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष होत असून, विविध जिल्ह्यांमध्ये केवळ जाहिराती करण्यावरच मग्न असून सरकार आमदार पळवणे यातच समाधान मानत असल्याची टीकाही नखाते यांनी केली आहे