लग्नाचा तगादा लावत महिलेचा विनयभंग

0
775

पिंपळे गुरव, दि. २७ जुलै (पीसीबी) – विवाहितेला लग्नाचा तगादा लावत तिचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2018 पासून मार्च 2023 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय अंकुश निरगुडे (वय 29, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित आहेत हे माहिती असून देखील आरोपीने फिर्यादीकडे लग्नाचा तगादा लावला होता. तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या आई व आजोबाला काहीतरी करेन अशी धमकी आरोपीने दिली. तो फिर्यादीला फोनवरून त्रास देत होता. गर्भवती असताना देखील फिर्यादीचा पाठलाग करत त्याने विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.