एकतर्फी प्रेमातून महिलेवर ब्लेडने वार

0
424

चिंचवड, दि. २७ जुलै (पीसीबी) – एकतर्फी प्रेमातून महिलेला त्रास देत तिच्या घरी येऊन तिच्यावर ब्लेडने वार केले. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवार (दि.24) ते बुधवार (दि. 26) या कालावधीत आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

नाना जालिंदर गायकवाड (वय 30), दादा पारस खवळे (दोघे रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला कामावर जात असताना त्यांना अडवून आरोपींनी त्यांच्याकडे मोबाईल नंबरची मागणी केली. तसेच फिर्यादीच्या घरी आरोपी दारू पिऊन आले. ‘आम्ही दोघे तुझ्या घरी येऊन घराचा दरवाजा वाजवतो हे तू माझ्या पत्नीला का सांगितले. ही गोष्ट आपल्या तिघातच ठेवायची होती ना’ असे म्हणून आरोपी नाना याने फिर्यादीचा हात पिरगाळून त्यांच्या हातावर ब्लेडने वार केले. तर आरोपी दादा याने फिर्यादिसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.