मरकळ गावात अवैध दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

0
380

मरकळ, दि. २७ जुलै (पीसीबी) – खेड तालुक्यातील मरकळ गावात अवैधरित्या लावलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी अडीच लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई बुधवारी (दि. 26) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार 45 वर्षीय महिलेच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने कोयाळी मरकळ रोडवर शिव वस्ती येथे अवैधरित्या दारू भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.