भगवती इंग्लिश मीडियम स्कूल चा प्रताप
सचिन काळभोर आंदोलनात्मक भूमिकेत
पिंपरी, दि. २७ जुलै (पीसीबी) – तळवडे रूपीनगर येथील भगवती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पहिल्या वर्गात शिकत शिकत असलेल्या विद्यार्थीनीस शाळेच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षक वैयक्तिक पातळीवर अल्पसंख्यांक असल्याकारणाने विनाकारण त्रास देत असल्याची घटना समोर आली आहे.
पिढीत अल्पसंख्यांक विद्यार्थिनीस वर्गाच्या बाहेर बसविण्यात येत असून मारहाण केली जात आहे.विद्यार्थिनी अवघी ६ वर्षाची असून तीस वर्गाच्या बाहेर काढले जात आहे. सदर विद्यार्थिनी आर टी ई नियमानुसार विद्यार्थीनीच ऍडमिशन झाले आहे. विद्यार्थिनीच्या पालकांकडून डोनेशन च्या नावाखाली पाच हजार रुपये रक्कम शाळेने जमा करून घेतली असून फक्त पाच हजार रुपयेच भरले म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकांकरवी विद्यार्थिनीस हीन वागणूक दिली जात आहे. सदर विद्यार्थिनी अल्पसंख्यांक असून आर टी आय अंतर्गत तिचा प्रवेश मिळाला आहे म्हणूनच नाहक विनाकारण त्रास दिला जात असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ अधिकारी ह्यांना तक्रार दाखल केली होती.मात्र कोणतीही समाधानकारक कारवाई न झाल्याने आंदोलनात्मक भूमिका घेत असल्याचे सचिन काळभोर यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात भगवती इंग्लिश मिडीयम स्कूल रुपीनगर तळवडे ह्या ठिकाणी दिनांक ३० जुलै २०२३ रोजी शाळा प्रशासनाला जाग येण्यासाठी शाळेसमोर झोपून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सचिन काळभोर यांनी दिली आहे.