सकल मातंग समाजाच्या मागण्या विधानसभेत उपस्थित करू, मंत्रिमंडळाला विशेष बैठकीचे आयोजन करायला भाग पाडू.

0
199

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे दवंडी यात्रेत आश्वासन

शहरातील युवा कार्यकर्ते सुनिल गव्हाणे आणि मयूर जाधव यांच्या पुढाकाराला यश.

पुणे, दि. २२ जुलै (पीसीबी) – सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे ते मुंबई “दवंडी यात्रेचे” आयोजन करण्यात आले होते. १८ जुलै रोजी पुणे संगमवाडी येथून या यात्रेचा प्रारंभ होऊन २ दिवसानंतर मुंबईतील आझाद मैदान येथे प्रचंड आंदोलनाने या दवंडी यात्रेचा समारोप झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे आणि राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना या आंदोलनाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती केली.

अनुसूचित जाती मध्ये अ ब क ड निहाय आरक्षणाचे वर्गीकरण करावे. बार्टीच्या धर्तीवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था (आर्टी) स्थापन करावी. क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करावी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा ९ वर्षाचा थकीत निधी देऊन महामंडळ पूर्ण क्षमतेने चालू करावे. शहीद संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबाला संपूर्ण शासकीय मदत देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करावे. ई. मागण्या यावेळी करण्यात आल्या.

सरकाकडून गेले अनेक वर्ष या मागण्या मान्य न करता केवळ दुर्लक्ष करण्यात आले. यापुढे आम्ही आता सहन करणार नाही असा रोष आंदोलन कर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी आझाद मैदान येथे उपस्थित राहून आंदोलन कर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वंचित समाजाला पुढे आणण्याचा कायमच विचार केला आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी पक्ष सतत उभा राहत आला आहे. अण्णाभाऊंचे स्मारक करण्यासाठी मी अर्थमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच सर्वप्रथम निधी उपलब्ध करून दिला. त्यातून वाटेगाव, सांगली येथे अण्णाभाऊंचे स्मारक दिमाखाने आज उभे आहे. यापुढेही राष्ट्रवादी पक्ष सर्व समाज घटकांच्या न्याय्य मागण्यांसाठी झटत राहील. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सकल मातंग समाजाच्या मागण्या नक्कीच उपस्थित करेल आणि त्याबरोबरच सरकारला या मागण्यासंदर्भात स्वतंत्र बैठक आयोजित करायला भाग पाडेल अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना दिली.

आझाद मैदानावरील सदरील आदोलनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, यांच्यासह जितेंद्र आव्हाड, सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस मयुर जाधव यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील सकल मातंग समाज समन्वयक ॲड राम चव्हाण,ॲड मारूती वाडेकर, रमेश गालफाडे,गणपत भिसे, भाऊसाहेबजी आडागळे, संदीपानजी झोंबाडे, शंकर तडाखे ,विष्णू कसबे, आण्णासाहेब कसबे, भास्कर नेटके, युवराज दाखले,नाना कसबे, सरपंच संदिप जाधव, सतिष भवाळ, अनिल गायकवाड, रामेश्वर बावने, शंकर खुडे, नितीन घोलप, दिपक चखाले, सुभाष गालफाडे ,बबन नेटके, ई. अनेक मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते