मोबाइल हिसकावणाऱ्या दोघांना अटक

0
330

देहूरोड, दि. २१ (पीसीबी) – रिक्षातून आलेल्या चार चोरट्यांनी बसची वाट पाहात असलेल्या तरुणाच्या हातातील मोबइाल हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी आठ वाजताच्या सुमारास साईनगर, देहूरोड येथे घडली. पोलिसांनी महिलेसह दोन जणांना अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.

नागेश बाळू भंडारी (वय 20), एक महिला आरोपी (वय 22, दोघेही रा. म्हातोबानगर, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिले आहे. शिवम चिनकाऊ गौतम (वय 18, रा. साईनगर, देहूरोड) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवम हे गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास साईनगर, देहूरोड येथे बसची वाट पाहात थांबले होते. त्यावेळी रिक्षातून चारजण आले. त्यापैकी महिलेने शिवम यांच्या हातातील मोबाइल हिसकावला. याबाबत एका नागरिकाने त्वरीत पोलिसांना माहिती दिली. जवळच असलेले पोलीस घटनस्थळी दाखल झाले. त्यांनी पाठलाग करून आरोपींना जेरबंद केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.