पिंपळे गुरव मधून रिक्षा चोरीला

0
236

पिंपळे गुरव येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली रिक्षा अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना 15 जुलै रोजी रात्री दहा वाजता काशीदनगर येथे घडली.

गोपाळ रामराव उखळे (वय 39, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच 12/एचसी 2285) काशीदनगर पिंपळे गुरव येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केली. रात्रीच्या वेळी एक महिला आणि एक पुरुष अशा दोन अनोळखी चोरट्यांनी रिक्षाचे लॉक तोडून रिक्षा चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.